प्रा. तानाजी सावंत यांनी खा. ओमराजे आणि आ. कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने चर्चेला उधाण 

आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ! राजकीय अर्थ काढू नये - आ. कैलास पाटील 
 
sawant

उस्मानाबाद -  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडील धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव ( शिवसेना ) शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं  शुक्रवारी घेतला. यावरून राज्यात  शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात  आज  वेगळचं चित्र पहावयास मिळाले. 

उस्मानाबादेत शिवजयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे नेते खा. ओमराजे निंबाळकर व आ.  कैलास पाटील हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी  तानाजी सावंत यांनी ओमराजे आणि कैलास पाटील यांना जवळ बोलावून त्यांचा हात उंचवला. या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. तानाजी सावंत हे शिंदे गटात गेल्यानंतर ओमराजे निंबळकर आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची दरार निर्माण झाली होती. मात्र तानाजी सावंत यांच्या या कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान याची राजकीय वर्तृळात चर्चा सुरू झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण देत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरून सहभागी झालो आहोत. या भेटीचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

याबाबत आ. कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की , शिवजयंती होती, त्यानिमित्त आम्ही सर्व एकत्र आलो होतो, यातून  राजकीय अर्थ काढू नये,  आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो, आहोत आणि कायम राहू. 

व्हिडीओ पाहा 

From around the web