वरवंटी येथे बिबट्याने केला गाईच्या वासरावर हल्ला
धाराशिव - धाराशिव तालुक्यातील वरवंटी परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्या आढळून आला असून, या बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडश्या पाडल्याने शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.दरम्यान, वरवंटी, कामठा, अपसिंगा, गावसुद, वडगांव परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
मौजे वरवंटी ता. जि. धाराशिव येथील शिवारात दि. 30 सप्टेबर 2023 रोजी सायं 4.00 ते 4.30 चे दरम्यान गाईचे वासरावर हल्ला करून मारले याबाबत माहिती मिळालेवरून दि.01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी वन अधिकारी / कर्मचारी यांनी जागेची पाहणी केली असता हल्ला बिबटयाने केल्याचे दिसून आले. हल्ल्यात मेलेल्या वासराचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले व घटनेचा पंचनामा, पशुधन मालकाचा जवाब नोंदविण्यात आला.
तसेच दि.02 ऑक्टोबर 2023 रोजी वन कर्मचान्यांसमवेत पाहणी केली असता सदरचे मृत वासराचे शरीर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मौजे वरवंटी ता.जि. धाराशिव येथील फॉरेस्ट गट क्र. 107 मध्ये ओढत नेऊन खाल्ल्याचे निदर्शनास आल्यामुळे यादिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आले व सायंकाळी मृत वासराचे शरीराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तरी मौजे वरवंटी, कामठा, अपसिंगा, गावसुद, वडगांव व इतर गावात खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचारी यांना तैनात केले असून सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे, शेतात रात्री बेरात्री मुक्काम न करण्याचा साथ सलोख्याचे नियम पाळून, समुहाने, गटाने शेतकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करु नये लहान मुलांना एकट्याने न फिरु देणे, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधणे तसेच सोशल मिडीयावर जी कोणती व्हिडीओ क्लिप बिबटया संदर्भात आली आहे तो आजपर्यंतची बिबट्याची अनधिकृत असून इतर प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होणान्या अफवांवर विश्वास ठेवु नये बिबट्या वन्यप्राण्यासारखा प्राणी आपणास आढळल्यास त्याची प्रथमतः वन विभागास / गावचे सरपंच / पोलीस पाटील यांना कळवावे व अफवा पसरण्यापासून दूर रहावे असे आवाहन करण्यात येत असून पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जिवीत हानी टाळण्याकरिता जनतेने सावधानता भडगावी असे आवाहन विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.