बस जास्त वेळ का थांबवली म्हणून एस टी चालकास धक्काबुक्की
भूम : बस जास्त वेळ का थांबवली म्हणून एस टी चालकास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शासकिय कामात आडथळा निर्माण केला.म्हणून भूम पोलीस स्टेशनमध्ये एका प्रवाश्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- विठ्ठल मनोहर शेलार, रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 02.10.2023 रोजी 17.00 वा. सु. वालवड बसस्थानक येथे फिर्यादी नामे- महादेव आदिनाथ उंबरे, वय 43 वर्षे,व्यवसाय- एस टी ड्रायव्हर, रा. शिवशंकर नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांना शिवीगाळ करुन तु एवढा वेळ येथे बस का थांबवली असे म्हणून धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. व शासकिय कामात आडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी महादेव उंबरे यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-353, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.