तुळजापूरजवळ  ट्रकवर पडलेल्या दरोड्यात एका पोलिसाचा सहभाग 

बाळासाहेब सुभेदार यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे चौकशाची मागणी 
 
s

उस्मानाबाद - तुळजापूर जवळ एका ट्रक चालकास बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ५ हजार रुपये रक्कम लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे , या आरोपीने आपल्या सोबत तुळजापूर पोलीस स्टेशनमधील एक पोलीस होता, अशी कबुली दिली आहे. या पोलिसास अटक करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे. 

दि. 20.08.2022 रोजी 04.15 वा. सुमारास ट्रक चालक- गौरव चव्हाण ( रा. कल्याण, जि. ठाणे )  यांनी तुळजापूर जवळील महामार्गावरील गती रोधकावर ट्रकचा वेग कमी करताच पाठीमागून आलेल्या नमूद कार ( क्र. एम.एच. 25 यु 1010  )  मधील दोन अनोळखी पुरुषांनी दगड फेकून मारुन ट्रकची समोरील काच फोडली आणि चालकाच्या कक्षात उजव्या बाजूने चढून चव्हाण यांना खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील 5,000 ₹ रक्कम लूटुन नेली. अशा मजकुराच्या गौरव चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन दि. 20.08.2022 रोजी  06.35 वा. गुन्हा नोंदवला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. या आरोपीने तुळजापूर पोलीस स्टेशनमधील एक पोलीस आपल्या सोबत असल्याची कबुली दिली आहे, मात्र पोलिसांनी त्या आरोपीस त्या पोलिसांचे नाव घेऊ नको, अशी दमबाजी केली आहे, असा आरोप सुभेदार यांनी केला आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दरोड्यात सहभागी असलेल्या पोलिसास अटक करण्याची मागणी सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. आरोपी आणि त्या पोलीसाचे दि. 20.08.2022 रोजीचे कॉल डिटेल्स  तपासण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

From around the web