U-19 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या राजवर्धन  हंगरगेकरची भारतीय क्रिकेट संघात निवड

 
s

उस्मानाबाद - येथील रायझिंग स्पोर्टसचा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन सहास हंगरगेकर याची वेस्ट इंडिज येथे जानेवारी २०२२ या महिन्यात होणाऱ्या आय.सी.सी आयोजीत १९ वर्षा खालील (U-19) विश्वचषक क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली असून दुबई येथे आशिया क्रिकेट चषक स्पर्धेसाठी सुध्दा त्याची निवड झाली आहे. विजय हजारे चपक स्पर्धेत त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने महाराष्ट्र संघास अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. 

उपांत्य सामन्यात कर्नाटक विरुध्द आक्रमक फटकेबाजी करून १३ धावांची नाबाद खेळी तीन बळी, अंतिम सामन्यात ७ बाद ६२ धावा महाराष्ट्र संघाच्या असताना त्याने परत यूवांधार फटकेबाजी करून ५० धावांची खेळी केली. विजय हजारे चमक, चैलेंजर ट्रॉफी, तिरंगी मालिका या स्पर्धेतील त्याच्या अष्टपैलू  खेळामुळे त्याची वेस्ट इंडिज येथे २०२२ मध्ये अंडर-१८ (U-19) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुबई येथे २३ डिसेंबर २०२१ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात त्याची निवड झाली असून यापूर्वी तो १४, १६, १९, २३ वर्षा खालील व टी २० मुस्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली होती. यापूर्वी चौरंगी मालिकांसाठी भारतीय ब क्रिकेट संघात निवड झाली होती. त्यास प्रशिक्षक राम हिरापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

संघटनेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, सचिव दता बंडगर, उपाध्यक्ष राम हिरापुरे, रायझिंग स्पोर्टस्चे अध्यक्ष रियाजभाई शेख, अभय गड़कर, नवनाथ डांगे, ऍड. प्रतिक देवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

From around the web