उस्मानाबाद श्री 2021 शरीरसोष्ठाव स्पर्धा उत्सहात 

तिरुपती उघडे याने उस्मानाबाद  श्री. 2021 किताब पटकावला 
 
g
शुभम जगताप उपविजेता तर अभिजित देशमुख याला बेस्ट पोझर सन्मान

उस्मानाबाद - करोना आपत्तीमुळे एक वर्षाच्या खंडानंतर उस्मानाबाद जिल्हा हौशी बॉडीबिल्डिंग व फिटनेस अससोसिएशन आयोजित व उस्मानाबाद शहर जिम ओनर्स अससोसिएशन पुरस्कृत *धाराशिव श्री 2021* या जिल्हास्तरीय शरीरसोष्ठाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत श्री. तुळजाभवानी स्टेडियम, उस्मानाबाद येथे पार पडलेल्या  या चुरशीच्या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा अससोसिएशनचे जिल्हाध्यक्ष  संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या तसेच असोसिएशनचे सचिव  राहुल बचाटे सर यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले .  स्पर्धेसाठी सोलापूरचे प्रमोद काटे, गोरख गडसिंग व शकील बडेघर यांनी पंच म्हणुन काम पहिले. 

या स्पर्धेत तिरुपती उघडे याने धाराशिव श्री. 2021 हा किताब पटकवला तर शुभम जगताप उपविजेता ठरला तर अभिजित देशमुख याला बेस्ट पोझर का सन्मान मिळाला.

55 kg गट

1. राज शिंदे
2. किरण घाडगे
3. कृष्णा सोळंकर
4. अनिकेत जानकर
5. राहुल राठोड

55 ते 60kg

1. पृथ्वीराज मुंढे
2. सर्फराझ कुरेशी
3. आफताब काझी
4. अलीम शेख
5. मेहबूब बेग

60 ते 65 kg

1. शुभम जगताप
2. शरद शेंडगे
3. राहुल काळे
4. काशिनाथ जमादार

65 ते 70kg

1. तिरुपती उघडे
2. लहू लकाळ
3. बाबुराव बामनकर
4. अजय पवार


70 ते 75


1. अभिजित देशमुख
2. रवी शेळके
3. सुरज धोत्रे
4. अविनाश पाथरूड
 

From around the web