क्रीडा नैपुण्य चाचण्याचे आयोजन

 
s

उस्मानाबाद -  आंतरराष्ट्रीय  आणि ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार तसेच अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यात येत आहे.

          क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि आर्मी स्पोर्टस इंन्स्टयुटयूटचे यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनीतील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्याचा चाचण्यां जिल्हास्तरीय  आयोजन पुणे येथील करण्यात आले आहे.

8 ते 12 वयोगटातील मुलांची  डायव्हिंग या खेळासाठी चाचणी 1 ऑक्टोबर रोजी, 10 ते 14 वयोगटातील मुलांची मैदानी या खेळासाठी 4 ऑक्टोबर, आर्चरी आणि कुस्तीसाठी 5 ऑक्टोबर,  वेटलिफ्टिंग चाचणी 6 ऑक्टोबर , बॉक्सींग 7 ऑक्टोबर आणि तलवारबाजी या खेळासाठी 8 ऑक्टोबर रोजी चाचणी घेण्यात येणार.  13 ते 14 वयोगटातील मुलांनसाठी ट्रायथलॉन या खेळाची चाचणी 7 ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार.खेळाडूंनी सकाळी 10 वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे उपस्थित राहावे. सहभागी खेळाडूंनी चाचणीस येताना त्यांचा जन्म दाखला, किंवा बोनाफाईड सोबत आणावे. तसेच आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत करणे अनिवार्य आहे. उस्मानाबाद जिल्हायातील जास्तीत जास्त्‍ मुलांनी सहभाग घ्यावा ,अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती भाग्यश्री बिले, जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेले आहे.

From around the web