उस्मानाबाद जिल्ह्यात क्रीडा ज्योतीचे उत्साहात स्वागत

 
s

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन पुणे येथे दि. 01 ते 12 जानेवारी 2022 दरम्यान महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धा 2022 च्या आयोजना निमित्त संपूर्ण राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच या स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यात होणे आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून भव्यतेने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन केले आहे.

                 राज्यातील प्रत्येक विभागातून ही क्रीडा ज्योत विविध जिल्ह्यातून पुणे येथे रवाना होणार आहे. लातूर विभागातून आज दुपारी 1:00 वाजता क्रीडा ज्योतीचे आगमन तुळजापूर येथे झाले. तुळजापूर मध्ये श्री. तुळजाभवानी मंदिरात ज्योतीचे स्वागत महाराष्ट्राचे प्रसिध्द अभिनेते  रितेश देशमुख,  अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि तहसिलदार योगिता कोल्हे यांनी केले. यावेळी अर्जुन पुरस्कारार्थी व तालुका अधिकारी सारिका काळे, आतंरराष्ट्रीय खेळाडू निकीता पवार, क्रीडा मार्गदर्शक प्रविण बागल तसेच अनेक खेळाडू उपस्थित होते.

                   त्यानंतर उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ज्योतीचे भव्य स्वागत छत्रपती पुरस्कारार्थी अंकुश पाटील, छत्रपती पुरस्कारार्थी सोमवंशी सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, अथलेटिक संघटनेचे योगेश थोरबोले, अर्जुन पुरस्कारार्थी सारिका काळे, आतंरराष्ट्रीय खेळाडू निकीता पवार, क्रीडा अधिकारी कैलास लटके, नदिम शेख आणि विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच खेळाडू यांनी स्वागत केले.

               छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनतर ज्योतीचे आगमन श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे झाले. जिल्हा स्टेडियम मध्ये अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी साहेब आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी स्वागत केले. यावेळी कुलदिप सावंत, अजिंक्य वराळे, विविध संघटनेचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते.

              त्यानंतर खेळाडूंनी उत्साहात शहरात भव्य रॅली काढून ज्योतीचे भोसले हायस्कूल येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भोसले हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी स्वागत केले. त्यानंतर बार्शी नाका येथे जिजामाता चौकात जिजाऊंच्या स्मारकास अभिवादन करून ज्योत पथकासह बार्शी मार्गे पुण्याकडे रवाना झाली.
 

From around the web