'साहेब चषक' क्रिकेट स्पर्धेला  बुधवार पासून प्रारंभ

क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन
 
d

उस्मानाबाद -  खुल्या तालुकास्तरीय ‘साहेब चषक’ क्रिकेट स्पर्धेला बुधवार, 23 मार्चपासून प्रारंभ होत आहे. उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर दि. 23 ते 28 मार्च 2022 या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असून क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे   नेते संजय निंबाळकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने 31 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये व चषक माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वतीने तर चौथे पारितोषिक 11 हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मृत्यूंजय माणिक बनसोडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंना वैयक्तिक बक्षीसे देखील ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये मॅन ऑफ द सिरीज 5 हजार रुपयाचे बक्षीस माजी नगरसेवक बाबा मुजावर यांच्या वतीने, मॅन ऑफ मॅच फायनल 2 हजार रुपये अनिकेत पाटील यांच्या वतीने, बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज 2 हजार रुपये माजी नगरसेवक बाबा इस्माईल यांच्या वतीने तर बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज 2 हजार रुपये जयंत देशमुख यांच्या वतीने अशी बक्षीसे ठेवणयात आलेली आहेत.

स्पर्धेसाठी माजी नगरसेवक प्रदीप घोणे, शेखर घोडके, रणवीर इंगळे यांचेही सहकार्य लाभलेले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. अधिक माहितीसाठी अक्षय बावसकर (8483959398), गणेश मगर (7385427466), ऋषी मोरे (9022993848), वैभव घोडके (8668318391), किरण चव्हाण (9579355763) यांच्याशी संपर्क साधावा, असेही संयोजकांनी कळविले आहे.

स्पर्धकांसाठी नियम
स्पर्धेत प्रथम येणार्‍या 16 संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. या स्पर्धा तालुकास्तरीय आहेत. सर्व सामने लिग पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. सामने सहा षटकाचे राहतील. थ्रो गोलंदाजी चालणार नाही, थ्रो गोलंदाजी आढळल्यास 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. संघांनी वेळेवर हजर रहायचे आहे, प्रत्येक सामन्यामध्ये बॉल हा संयोजकांकडून घ्यावा लागेल, त्याचे शुल्क घेतले जाणार नाही. पंचाचा निर्णय अंतिम असेल, स्पर्धेत संघाची नोंदणी करण्यासाठी अर्ज आणि शुल्क 3999 रुपये जमा करणे अनिवार्य आहे.

From around the web