उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याचा आयपीएलमध्ये प्रवेश 

चेन्नईच्या संघमालकाने दिड कोटी रुपये मोजले 
 
d

उस्मानाबाद : उस्मानाबाचा अष्टपैलू खेळाडू  राजवर्धन हंगरगेकर याची आयपीएल 2022 च्या महालिलावात बोली लागली आहे.  चेन्नईच्या संघमालकाने दिड कोटी रुपये त्याच्यावर मोजले आहेत. आयपीएलमध्ये चमकणारा उस्मानाबादचा हा पहिला क्रिकेटपटू असून, जिल्ह्यासाठी नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.  १९ वर्षाखालील वर्ल्डकल्पमध्ये त्याने केलेली चमकदार खेळी त्याला आयपीएलपर्यंत घेऊन गेली आहे.


वडिलांचे कोरोनाने दोन वर्षापुर्वी निधन झाल्यानंतर त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राजवर्धन त्याच तडफेने खेळत राहिला. त्याच्या वडीलांची स्वप्नपुर्ती करणारा राजवर्धन यशासमीप गेल्याचे दिसुन येत आहे.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे. भारतीय संघातील सहा खेळाडू ऐनवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते तरीदेखील भारताने मोठे विजय मिळवले. या विजयात मूळचा उस्मानाबादचा असलेल्या राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा होता.

अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं क्रिकेट विश्वात राजवर्धन लंबी रेस का घोडा ठरणार असल्याचे बोलल जात आहे. केवळ गोलंदाजीच नव्हे तर, फलंदाजीतही त्यान आपली चमक दाखवुन दिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला राजवर्धन आता संघमालकाच्याही नजरेत भरल्याचे दिसुन येत आहे. आजवर केलेल्या कष्टाच चिज होत असल्याच्या भावना जिल्हाभरातुन व्यक्त होत आहेत.
 

From around the web