जिल्हास्तरीय सुब्रती मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 
futbol

उस्मानाबाद -   येथील जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, येथे दि.21 ते 22 जुलै 2022 या कालावधीत करण्यात आले आहे.

वयोगट,14 वर्षे मुले व 17 वर्षे मुली आणि 17 वर्षे मुले,स्पर्धा कालावधी दि.21 व 22 जुलै 2022 स्पर्धा व उपस्थिती ठिकाण श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद,खेळाडू उपस्थिती स्पर्धेच्या दिवसी सकाळी 9.30 वाजेपर्यंत.

स्पर्धेबाबत महत्वाच्या सूचना 1) 14 वर्षाखालील मुले (दि.01 जानेवारी,2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा),2) 17 वर्षाखालील मुले व मुली (दि.01 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असवा),3) खेळाडुकडे विहित नमुन्यातील ओळखपत्र,(जन्म दाखला,आधारकार्ड झेरॉक्स),असणे अनिवार्य आहे.4) शाळेची/महाविद्यालयाची प्रवेश फीस (50 रुपये)भरून प्रवेशिका ही दि.20 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयात जमा करावी किंवा distsports.osmanabad@gmail.com  या ईमेल आयडीवर प्रवेशिका सादर करून या स्पर्धेत जिल्हयातील जास्तीत जास्त संघानी सहभागी होण्याचे आवाहन जगन्नाथ लकडे जिल्हा  क्रीडा अधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

From around the web