अट्टल चार दरोडेखोर गजाआड 

 आठ गुन्ह्यातील ९ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्‍त
 
s
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

उस्मानाबाद  - जिल्ह्याच्या विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालून दरोडा टाकून पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान निर्माण केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अट्टल चार दरोडेखोरांना जेरबंद करून ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या ताब्यातून ९ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.२८ रोजी जिल्ह्यात विविध भागात चोऱ्या करणाऱ्या आरोपींची गुप्त खबऱ्या मार्फत माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून कळंब तालुक्यातील ईटकुर येथील घोगा पारधी पीडी येथून भास्कर शहाजी शिंदे वय- ३० वर्षे, रामेश्वर ऊर्फ सुंदर बबन शिंदे वय-२९ वर्षे व नथुराम ऊर्फ तथन बबन शिंदे वय-२९ वर्षे तर कळंब तालुक्यातील ईटकुर येथील गायरान पिडी येथून आबा शहाजी काळे वय-२५ वर्षे या चौघांना पकडून त्यांना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेला  ९ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले ८ गुन्हे उघडकीस आणले.

या चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी यापूर्वीच कळंब गुरनं. १५३/२०२१ कलम ४५६, ३८० भादंवि, येरमाळा गुरनं. ४६/२०२१ कलम ३७९ भादंवि, येरमाळा गुरनं. ५८/२०२१ कलम ४६१, ३८० भादंवि, ढोकी गुरनं. १७५/२०२० कलम ४५७, ३८० भादंवि, वाशी गुरनं. ९७/२०२१ कलम ३७९ भादंवि, उमरगा गुरनं. ३२/२०२० कलम ३८९ भादंवि, आनंदनगर पोलिस ठाण्यात गुरनं. ११०/२०२० कलम ३७९ भादंवि व गुरनं. १२६/२०२१ कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पी.व्ही. माने, पोउपनी भुजबळ, पोहेकॉ ठाकुर, पोहेकॉ काझी,पोना सय्यद,पोना चव्हाण, पोकॉ सर्जे, पोकॉ जाधवर,पोकाॅ मरलापल्ले,पोकॉ आरसेवाड, चालक पोना कावरे व चालक पोकॉ माने यांच्या पथकाने केली.

From around the web