उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२१ चा पीक विमा मिळणार ? 

उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांची वसुली मोहीम सुरु 
 
s

उस्मानाबाद - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२१ नुकसान भरपाईची देय रक्कम बजाज अलायन्स कंपनीच्या बँक खात्यातून उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वळती करण्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुणे येथील सिटी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकांना दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी वसुली मोहीम सुरु केल्याने बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. 

पुणे येथील बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे  प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत सन २०२१ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ३९५  शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक विमा भरला होता. त्यांना  ७४८ कोटी ६९ लाख मिळणे अपेक्षित असताना, कंपनीकडून ३७४ कोटी ३४ लाख इतकी रक्कम देण्यात आली, उर्वरित ५० टक्के रक्कम ३७४ कोटी ३४ लाख  येणे बाकी आहे. 

या रक्कमेची वारंवार मागणी करूनही बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुणे सिटी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकांना पत्र देऊन, ही रक्कम उस्मानाबाद जिल्हाधिकारी खात्यावर वळती करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच अन्य रक्कम इतर खात्यावर वर्ग न करण्यासाठी खाते ब्लॉक करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. 

From around the web