उमरग्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या 

कार पेटवत नागरिकांचा रस्त्यावर संताप 
 
s

उमरगा -  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे , या मागणीसाठी तालुक्यातील माडज येथील तरुणाने बुधवारी (ता. सहा) तलावात आत्महत्या केल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केल्याच्या  घटनेनंतर गुरूवारी (ता. सात) सकाळी माडज गावातुन मयत किसन माने यांचा मृतदेह घेऊन घोषणाबाजी करत जमाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. उत्तरीय तपासणीनंतर जमाव उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला. दरम्यान या वेळी शासकिय विश्रामगृहासमोर दोन तरुणांनी कार पेटवून देत मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात आंदोलनाची धग सुरु असताना, माडज येथील किसन माने या ३० वर्षीय तरूणाने, बुधवारी गावातील शिवकालीन तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी किसनने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणने असल्याने महसूल व पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत माहिती कळवली. रात्रभर माडज महसूल व पोलीस प्रशासन घटनेवर लक्ष ठेऊन होते. बुधवारी सकल मराठा कडून उमरगा शहर बंद चे आवाहन सोशल मीडिया च्या माध्यमातून करण्यात आल्याने उमरगा शहर, नारंगवाडी व माडज ही गावे संपूर्ण बंद होती.तर उमरगा बस आगारातून एका ही बस सुटली नाही 

गुरुवारी सकाळी दहा च्या सुमारास आत्महत्या केलेला तरुण किसनचा मृतदेह, एका वहानात घेऊन जमाव हुतात्मा स्मारकापासुन घोषणाबाजी करत शव विच्छेदन करिता  उपजिल्हा रुग्णालयात पोहचला. तेथे आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, भाजपाचे कैलास शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, बसवराज वरनाळे, रज्जाक अत्तार, प्रा. शौकत पटेल आदींची उपस्थिती होती. शेतकरी नेते विनायकराव पाटील, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, तुळजापूरचे योगेश केदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भावना व्यक्त केल्या.

s

कार पेटवून केला निषेध 

शव विच्छेदन नंतर  आंदोलन कर्ते येथील उपविभागीय कार्यालयासमोर जमा झाले असता,शासकिय विश्रामगृहासमोर तीन, चार तरुणांनी रस्त्यावर एका जुनी कार पेटवुन दिली. त्यानंतर त्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी किसनच्या मृतदेहाचे दर्शन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली.

  दरम्यान पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर, तहसीलदार गोविंद येरमे, रतन काजळे, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा होता. 

कार पेटवून केला निषेध 

माडज येथील तरूणाच्या मृत्यूनंतर त्याचे पडसाद उमरगा शहरांत उमटले. गुरूवारी जमाव उपविभागीय कार्यालयासमोर आल्यानंतर शासकिय विश्रामगृहासमोर तीन, चार तरुणांनी रस्त्यावर कार पेटवुन दिली. त्यानंतर त्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी किसनच्या मृतदेहाचे दर्शन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली.

From around the web