उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना
Jun 24, 2020, 19:23 IST
उस्मानाबाद : तेजसिंह हरित खेडे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 9923 ही दि. 20.04.2020 रोजी मध्य रात्री त्यांच्या पत्रा शेड समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या तेजसिंह खेडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 23.06.2020 रोजी नोंदवला आहे.
उस्मानाबाद : शिराज इसामोद्दीन शेख, रा. रामनगर, उस्मानाबाद यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1407 ही दि. 17.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शिराज शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.
उस्मानाबाद : विकी राम आडागळे, रा. अभियांत्रीक महाविद्यालय शेजारी, उस्मानाबाद यांनी त्यांची हीरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 14 जीएम 4806 ही दि. 21.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अशा मजकुराच्या विकी आडागळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.
परंडा: किरण कल्याण ऐतवाडे, रा. कुऱ्हाड गल्ली, दर्गा रोड, परंडा यांनी त्यांची मोटारसायकल दि. 23.06.2020 रोजी मध्य रात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. सदर मोटारसायकलचे पुढील चाक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या किरण ऐतवाडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.