कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश

 
 कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना  सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश


            उस्मानाबाद  :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हयामध्ये विविध आस्थापना त्यांना निश्चित केलेल्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेवर चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

           कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत व्यापाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी तसेच जीवनावश्यक वस्तू , उदा. शेतमाल, किराणा व भुसार मालाची लिलावाद्वारे विक्री केली जात असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरक्षित होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना चालू ठेवणे आवश्यक आहे.

          त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

           या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

From around the web