उस्मानाबादेत सोशल डिस्टीन्सिंग करिता ऑटोरिक्षात पडदे 

 
उस्मानाबादेत सोशल डिस्टीन्सिंग करिता ऑटोरिक्षात पडदे 
उस्मानाबाद :  ऑटोरीक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात कोरोना (कोविड- 19) आजाराचा संसर्ग पसरु नये म्हणुन उस्मानाबाद पोलीसांच्या शहर वाहतुक शाखे तर्फे शहरातील ऑटोरीक्षांत चालक व प्रवासी अशा दोघांमध्ये पडदा लावण्यास ऑटोरीक्षा चालक- मालक यांना प्रेरीत केले जात आहे. त्याचे महत्व पटल्याने अनेक ऑटोरीक्षा चालक- मालक आपल्या ऑटोरीक्षांमध्ये असे पडदे स्वेच्छेने बसवून घेत आहेत. या उपक्रमातून कोरोना संसर्ग रोखन्यास मदत होणार आहे. तरी सर्व ऑटोरीक्षा चालक- मालक यांनी असे पडदे आपल्या ऑटोरीक्षात लाउन घ्यावेत असे आवाहन शहर वाहतुक पोलीसां मार्फत करण्यात येत आहे.

From around the web