मुस्लिम दफनभूमीसाठी धाराशिवमध्ये सात एकर जागा देण्याचे पालकमंत्री सावंत यांचे आदेश

 
s

धाराशिव  :  धाराशिव  शहरातील मुस्लिम समाज दफनभूमीसाठी सात एकर जागा देण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत  होती. यासाठी मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ पालकमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.  

भारतीय स्वातंत्र्यदिनी ( दि 15 ऑगस्ट )  रोजी पालकमंत्री सावंत यांची मसुद शेख, कादर खान, आयाज शेख, बाबा मुजावर, अनवर शेख, वाजिद पठाण, अफरोज पिरजादे, असद पठाण, बिलाल तांबोळी, एजाज काझी, मुजीब काझी, अतिक शेख, पैगंबर भाई, रसूल भाई , गयाज मुल्ला , खलिफा कुरेशी यांनी भेट घेऊन  मुस्लिम समाजासाठी सात एकर जागेची मागणी करण्यात केली  पालकमंत्री सावंत यांनी जागेवर निर्णय घेत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला मुस्लिम समाजासाठी सात एकर जागा चार दिवसाच्या आत मध्ये देण्याचे आदेश दिले आहेत.

धाराशिव शहरालगतची सर्वे नंबर 426 मधील सात एकर जागा देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी केली होती‌. कब्रस्तान दफनभूमीसाठी पालकमंत्री यांनी प्रशासनाला आदेश दिल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने पालकमंत्री तानाजी सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांचे व जिल्हाधिकारी , जिल्हा प्रशासनाचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

From around the web