उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल
उस्मानाबाद : जिल्हयातील एक 17 वर्षीय मुलगी दिनांक 29 जुन रोजी 18.30 वा गावातील रस्त्याने पायी जात असतांना दोन मोटार सायकलवर आलेल्या चौघा तरुणांनी मोटार सायकल आडवी लावुन तिला थांबवले. त्यातील एका तरुणाने तिचा हात पकडुन, “तु माझ्याशी न बोलल्यास माझ्याजवळ असलेला तुझा व्हिडीओ मी इंटरनेटवर पसरवेल .” अशी तिला धमकी दिली.
हा प्रकार पाठीमागुन येणा-या त्या मुलीच्या चुलत भावाने बघुन त्या चौघा तरुणांना हटकले असता त्या चौघांनी त्या मुलीसह तीच्या चुलत भावास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीने दिनांक 02 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 341, 354, 506,34 सह पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तीन ठिकाणी हाणामारी
येरमाळा: तुकाराम शिंदे रा.पानगाव, ता.कळंब हे दिनांक 29 जुन रोजी 17.00 वा आपल्या शेतात होते.भाउबंद इंदुबाई, फुलबाई, रामेश्वर,शिवाजी, माणीक यांनी शेतीच्या वादातुन तुकाराम यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी,काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 143, 148,149,323, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : बाबुराव गोफने,रा.भोत्रा हे दिनांक 01 जुलै रोजी 20.30 वा आपल्या शेताजवळील रस्त्यावर होते. यावेळी गावकरी अजित व किशोर पवार यांनी बाबुराव यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 324, 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : बिभीषण गायके, रा. मंगरुळ हे दिनांक 02 जुलै रोजी 08.30 वा घरासमोर असतांना गावकरी पाडळे कुटुंबीय राजेंद्र, शिरु, साखराबाई, सारीका यांनी नांगर ढकलण्याच्या वादातुन बिभीषण यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. बिभीषण यांच्या बचावास त्यांची पत्नीसह मुलगा-अविनाश हे सरसावले असता पाडळे कुटुंबीयांनी त्यांनाही मारहाण केली. यावरुन भादसं कलम 324, 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.