भूममध्ये एसटीची मोटारसायकलला धडक, तरुण ठार 

 
crime

भूम   :फिर्यादी नामे- आकाश हनुमंत गुंजाळ, वय 25 वर्षे, सोबत चुलत भाउ नामे- सुनिल बिभीषण गुंजाळ, वय 35 वर्षे, रा.वांगी बु, ता. भुम जि. उस्मानाबाद हे दोघे दि.05.09.2023 रोजी 17.00 वा. सु. ईट ते भुम रोडवर सुकटा गावातील रामगंगा तलावाचे पुलाचे जवळ सुकटा येथुन मोटरसायकल क्र एमएच 13 सीएल 4417 वरुन गावाकडे जात होते.

 दरम्यान एस. टी. बस क्र एमएच 20 बीएल 1869 चा अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील एस टी बस ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून आकाश गुंजाळ यांचे मोटरसायकलला चुकीच्या दिशेने येवून समोरुन धडक दिली. या आपघातात फिर्यादीचा चुलत भाउ सुनिल गुजांळ  हे गंभीर जखमी  होवून जागीच मयत झाले. नमुद एस. टी. बस चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास न नेता अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी आकाश गुंजाळ यांनी दि.06.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 अ सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरग्यात एक जखमी 

उमरगा  :फिर्यादी नामे-विष्णु अप्पात घंटे, वय 33 वर्षे, सोबत त्यांची आई रा. एकुरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दोघे दि.03.09.2023 रोजी 10.30 वा. सु. एकुरगा ते व्हंताळ जाणारे रोडवर सुभाष करके यांचे शेताजवळून मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 7092 वरुन जात होते. दरम्यान टेम्पो क्र एमएच 14 सीपी 8756 चा अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून विष्णु घंटे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात फिर्यादी यांचे घोटा व हात फॅक्चर झाला असुन फिर्यादी यांचे आई ह्या गंभीर जखमी झाल्या. नमुद टेम्पो चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास न नेता अपघात स्थळावरुन पसार झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी विष्णु घंटे यांनी दि.06.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो. वा. का. कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

           

From around the web