वाशी : गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

 
d

वाशी  : वाशी हद्दीतील मौ. मांडवा  येथे गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संजय सुभाष पवार, नानीबाई सुभाष पवार,  सचिन शिंदे अशी त्यांची नावे आहेत. 


गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पो. स्टे. वाशी हद्दीतील मौ. मांडवा येथील इसम नामे- संजय सुभाष पवार, रा. मांडवा, ता. वाशी हे त्याचे राहत्या घरी गांजा अंमली पदार्थ आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले वरुन स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमांना त्यांचे  नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- संजय सुभाष पवार, नानीबाई सुभाष पवार, सचिन सुरेश शिंदे सर्व रा. मांडवा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्‌तर दिल्याने पथकाने सदर घराची पाहणी केली. 

त्यामध्ये पेपरमध्ये गुडाळलेल्या सदृस्य पदार्थ  2,141 कि. ग्रॅम, पिशवीमध्ये गांजा सदृश्य पदार्थ 3.707 कि.ग्रॅ  सहीत असा एकुण 58,540 ₹ किंमतीचा गांजा तसेच देशी विदेशी दारुच्या 37 सिलबंद बाटल्या  व गावठी दारु  30 लि. असा एकुण  8,470 किंमतीची  दारु, एक इलेक्ट्रीक वजन काटा किंअं 500 ₹, रोख रक्कम 46,500 ₹ एक तलवार व चार सत्तुर असा एकुण 1,13,950 ₹ यांचे घरामध्ये ठेवलेला माल मिळून आल्याने  सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्री करणारा संजय सुभाष पवार, नानीबाई सुभाष पवार, सचिन शिंदे यांचेविरुध्द  एन. डी. पी. एस कायदा कलम-  20 सह भा. ह.का. कलम 4/25  म.दा.का. 65 ई आंतर्गत गुरंन 164/2023 असा गुन्हा वाशी  पो.ठा. येथे 01.06.2023 रोजी नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत, एम. रमेश सहा. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी- ससाणे, पोउपनि- निंबाळकर, मपोउपनि .फड, पोलीस नाईक- यादव, चाटे, पोलीस अंमलदार-करवर, सुरवसे, राठोड, दहिहांडे यांच्या पथकाने केली

From around the web