धाराशिवच्या भाजी मंडईत चोरांचा सुळसुळाट , दोन चोरटे सापडले 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- शेख हारुण महेबुब, वय 57 वर्षे,रा. खाजानगर गल्ली नं 18 धाराशिव ता. जि. धाराशिव यांचा व  सुग्रीव लक्ष्मण घोंगरे तसेच संभाजी जयराम तोगरे या तिघांचे विवो कंपनीचे 2 मोबाईल फोन व नोट 9 कंपनीचा एक मोबाईल फोन असे 3 मोबाईल फोन अंदाजे 38,000₹ किंमतीचे हे दि. 24.09.2023 रोजी 09.15 ते 0945 वा. सु. देशपांडे स्टँड भाजी मंडई धाराशिव ता.जि. धाराशिव येथुन गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या शेख हारुण यांनी दि.24.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे गुरनं 372/2023 भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

सदर गुन्ह्याच्या तपासात धाराशिव पो ठाणे च्या पथकाने दोन संशईत आरोपी नामे 1) कृष्णा ज्ञानेश्वर जाधव, वय 21 वर्षे, 2)अनिल मोहन गुंजाळ, वय 22 वर्षे रा.नागोबागल्ली बीड यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपी यांनी गुन्ह्याची कबूली दिली. व त्यांचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 तुळजापूर  : फिर्यादी नामे-बालाजी शंकर बनकर, वय 43 वर्षे, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे कसई शिवारातील शेत गट नं 7 मधील व इतर शेतकऱ्यांचे शेतातील फिनोलेक्स कपंनीचे स्प्रिंक्लरचे 19 नोजल व बोअरचे 1,130 फुट केबल, असा एकुण 30,800₹ किंमतीचा माल हा दि. 23.09.2023 रोजी 18.00 ते दि. 24.09.2023 रोजी 07.00  वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी रमजान शेख यांनी दि.24.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे- रमजान अलीदस्तुर शेख, वय 39 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 0460 ही दि. 20.09.2023 रोजी 22.00 ते दि. 21.09.2023 रोजी 07.00 वा. सु.रमजान शेख यांचे राहाते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी रमजान शेख यांनी दि.24.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web