बावी पाटी जवळ अपघातात दोन ठार, दोन जखमी
धाराशिव : ढेकरी, ता. तुळजापूर येथील-श्रीनाथ ज्ञानेश्वर काळे, वय 18, वर्षे सोबत बहिण- निशा अभिजीत शिंदे रा. पिंपळा खुर्द, ता. तुळजापूर आई- वैशाली ज्ञानेश्वर काळे, दोन भाचे ऋषभ शिंदे, विराज शिंदे हे सर्वजण दि.19.06.2023 रोजी 11.50 वा. सु. एनएच 52 उस्मानाबाद ते तुळजापूर रोडने मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 5947 वरुन जात होते.
दरम्यान मौजे बावी पाटी जवळ श्रीनाथ यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने मोटरसायकलची डिव्हायडरला धडक आपघात झाला. या आपघातात श्रीनाथ व निशा हे दोघे गंभीर मार लागून मयत झाले. तर वैशाली, ऋषभ व विराज हे गांभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अभिजीत शिवमुर्ती शिंदे यांनी दि.28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 128/177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
देवसिंगानळ तांडा येथे दोन गटात हाणामारी
नळदुर्ग : देवसिंगानळ तांडा, तुळजापूर येथील- शेखर राठोड, शंकर राठोड, शिवाजी राठोड, विनोद जाधव, अन्य 5 या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 27.06.2023 रोजी 08.30 वा. सु. देवसिंगा नळ तांडा तुळजापूर येथे यावेळी गावकरी- शानुबाई वंसत राठोड, वय 50 वर्षे यांची मुले सुनिल व अनिल यांना घरात प्रवेश करुन शिवीगाळ केली. व लाथाबुक्यांनी, दगडाने, वायरने, काठीने, मारहाण करुन जखमी केले. ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शानुबाई राठोड यांनी दि. 28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 452, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : देवसिंगानळ तांडा, तुळजापूर येथील- धेनु राठोड, सुनिल राठोड, अनिल राठोड, दिपक जाधव, अन्य 4 या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 27.06.2023 रोजी 08.30 वा. सु. देवसिंगा नळ तांडा तुळजापूर येथे यावेळी गावकरी- लालु तुकाराम जाधव, वय 70 वर्षे यांचा नातु शंकर राठोड यांना घरात शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, वायरने, काठीने, मारहाण करुन जखमी केले. ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लालु जाधव यांनी दि. 28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.