धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, सहा जखमी 

 
crime

तुळजापूर  : हिंगणगाव, ता. कवठे महाकाळ येथील- नितीन वंसत कुंभार  सोबत आई- लक्ष्मी, बहिण- मनिषा, भावजी- सौदागर, रुपाली वंसत महादेव कुभांर, वय 67 वर्षे, हे कार क्र एम एच 45 एडी 9195 मधुन दि.14.05.2023 रोजी 16.00 वा दरम्यान उस्मानाबाद ते तुळजापूर जवळील बायपास जाणाऱ्या रोडवरुन जात होत. दरम्यान नितीन यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे चालवल्याने  कारचा आपघात होऊन या आपघातात वंसत हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. तर नितीन  व आई- लक्ष्मी, बहिण- मनिषा, भावजी- सौदागर, रुपाली दोन मुली जखमी झाले. अशा मजकुराच्या बसवराज प्रदिप कुंभार यांनी दि.18.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो वा का. क 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद येथील- बलभिम विठ्ठल पवार, वय 57 वर्षे, हे दि.29.03.2023 रोजी  14.30 वा. सु. ताजमहल टॉकीज समोर रोडवर उस्मानाबाद येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात कार चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे चालवून बलभिम यांना धडक दिली.या आपघातात बलभिम हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात कार चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या शकुंतला बलभिम पवार यांनी दि.18.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो वा का. क 134 अ ब  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                             

From around the web