कळंब , वाशी  येथे अपघातात दोन ठार 

 
crime

कळंब  : आरोपी नामे- रजाक सत्तार शेख, वय 35 वर्षे, रा. परळी, ता. परळी  जि. बीड ह.मु. इस्लामपूर डिकसळ, कळंब जि. धाराशिव सोबत मयत नामे- सुमित्रा ज्ञानेश्वर सोनवणे, वय 55 वर्षे, रा. सम्राट अशोक नगर कळंब जि. धाराशिव हे दोघे दि. 09.09.2023 रोजी 10.30 वा. सु. आय टी आय तांदुळवाडी च्या पुढे काही अंतरावर हॉटेलच्या समोर डांबरी रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 44 डब्ल्यु 3914  वरुन जात असताना रजाक शेख यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने त्याचे पाठीमागे बसलेल्या सुमित्रा सोनवणे या गाडीवरन खाली पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानेश्वर सटवाजी सोनवणे रा. सम्राट अशोक नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : मयत नामे- रफिक बाशुमियाँ पठाण, रा. पारगाव, ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 16.09.2023 रोजी 05.30 वा. सु. पारगाव येथे नॅशनल हायवे 52 वर पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रफिक पठाण धडक दिली. या आपघातात रफिक पठाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद अज्ञात वाहन चालक हा आपघात स्थळावरुन  अज्ञात वाहना सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी सुरया रफिक पठाण रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 134 अ ब, 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 धाराशिव  : आरोपी नामे-1)हनुमंत सुरेश माने, वय 28 वर्षे, रा. उपळा ता. जि. धाराशिव यांनी दि. 16.09.2023 रोजी 11.05 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा  क्र एमएच 25 एके 1452 हा  बसस्थनक धाराशिव समोर ईन गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आला. तर आरोपी नामे-2)अनिकेत अरुण वाघमारे वय 21 वर्षे, रा. शिंगोली  ता. जि. धाराशिव यांनी दि. 16.09.2023 रोजी 11.05 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा  क्र एमएच 25 एके 1175 हा बसस्थानक धाराशिव समोर ईन गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आला. आरोपी नामे-3)सचिन शांतीराम जाधव, वय 22 वर्षे, रा. सेवालाल कॉलनी, धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 16.09.2023 रोजी 11.05 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा  क्र एमएच 25 एके 0449 हा  बसस्थनक धाराशिव समोर ईन गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web