धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापुर  :दि.10.08.2023 रोजी 00.01 ते 03.00 वा. सु. तिर्थ बु ता. तुळजापूर जमीन गट नं 2 मध्ये इंढस टॉवर येथुन इंडस कंपनीच्या टॉवरच्या अमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या अंदाजे 12,000₹ किंमतीच्या  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी महादेव पंडीत ढवण, वय 39 वर्षे, व्यवसाय निसा सिक्युरिटी कंपनी पुणे अंतर्गत लातुर व पुणे रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.28.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा  : फिर्यादी नामे-पांडुरंग सुभाष देवराम, वय 27 वर्षे रा. सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 1,00,000₹ किंमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 2153 ही दि.24.08.2023 रोजी 22.00 ते दि.25.08.2023 रोजी 01.10 वा. सु. पांडुरंग देवराम यांचे राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी पांडुरंग देवराम यांनी दि.28.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                  
शेतीच्या कारणावरून मारहाण 

तुळजापूर : आरोपी नामे-1)बबन नामदेव राठोड, 2)लालसिंग नामदेव राठोड, 3)राजेंद्र तुकाराम राठोड,4) आकाश तुकाराम राठोड, 5)शिवाजी गना राठोड,6) नामदेव गना राठोड, 7) तुकाराम गना राठोड, 8) देवीदास गना राठोड, 9) बायडाबाई बबन राठोड, 10) सारीका सुनिल राठोड, 11) लिंबाबाई नामदेव राठोड सर्व रा.गंधोरा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.23.08.2023 रोजी 16.00 वा. सु. देवसिंगा शिवारातील शेत गट नं 87 मध्ये फिर्यादी नामे- कल्पना राजकुमार मस्के, वय 45 वर्षे रा. वडगाव देव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना शेतीचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादी यांचे शेतीवर अनाधिकृतरित्या कब्जा करुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी कल्पना मस्के यांनी दि.28.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 149,447, 506.अ.जा.ज.अ. प्र.का कलम 3 (1)(आर)(एस), 3(1)(टी), 3(1)(जी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web