धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
वाशी : दसमेगाव, ता. वाशी येथील- बिभीषन बाबुराव मोरे, वय 41 वर्ष, यांचे किराणा दुकानाचे पाठीमागील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.30.06.2023 रोजी 11.00 ते दि.01.07.2023 रोजी 01.00 वा. सुमारास उचकटून आत प्रवेश करुन सोयाबीन तेलाचे दोन बॉक्स, पारले बिस्कीट 1 बॉक्स,निरमा पुडे 40, ॲक्टीव्हा फिक्सल कपंनीचा कॅमेऱ्याचा संपुर्ण सेट असा एकुण 12,220 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बिभीषन मोरे यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :शिराळा, ता. परंडा येथील- अमिन गौबीसाब मुलाणी, वय 36 वर्ष, यांचे दि. 30.06.2023 रोजी 22.00 ते दि 01.07.2023 रेाजी 11.00 वा. सु शिराळा शिवारात सिना नदीमधील के.टी.एस. कंपनीची 5 एचपीची विद्युत पंप अंदाजे 4,000 ₹ किंमतीचा, टर्बो कंपनीची 5 एचपी विद्युत पंप अंदाजे 5,000 ₹ किंमतीचा व अहमदाबादी कंपनीचा 7.5 एचपीचा विद्युत पंप असे एकुण 18,000 ₹ किंमतीचे दोन विद्युत पंप. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अमिन मुलानी यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
येरमाळा : तेरखेडा ता. वाशी ग्रामस्थ- बापू माणिक कोळी यांनी दि.02.07.2023 रोजी 18.00 वा. सु. तेरखेडा ते कडकनाथवाडी येथे रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.