धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, दोन जखमी 

 
crime

मुरुम  : आष्टाकासार, वसंतवाडी तांडा, ता. लोहारा येथील- राजेंद्र नामदेव राठोड, वय 45 वर्षे, हे दि.22.05.2023 रोजी 14.30 वा. सु. आष्टाकासार ते मुरुम जाणारे रस्त्याने मोटरसायकल क्र एमएच 24 बीपी 3282  वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल  क्रं एमएच 12 एफसी 8493 चा चालक नामे बालाजी रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने राजेंद्र यांच्या मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात राजेंद्र हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सुनिल राजेंद्र राठोड यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ)अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : तेर, ता. उस्मानाबाद येथील- महादेव नारायण भंडारी, वय 43 वर्षे, हे दि.23.05.2023 रोजी 19.15 वा. सु. पांडुरंग मगर यांचे शेताजवळ तेरणा धरणाचे कॅनलजवळून रस्त्याने पायी जात होते. दरम्यान मोटरसायकल  क्रं एमएच 25 एटी 0929 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने महादेव यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात महादेव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- बळीराम भंडारे यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब  : वरपगाव, ता. केज येथील- बाजीराव नारायण देशमुख, वय 43 वर्षे, हे दि.06.04.2023 रोजी 21.00 वा. सु. राजवाडा धाग्या समोर खोंदला शिवार येथुन स्विफट कार क्र एमएच 02 बीवाय 7232  मधून जात होते. दरम्यान ट्रॅक्टर  क्रं एमएच 25 एडब्ल्यु 7929 चा चालकाने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने चुकीच्या दिशेने येऊन बाजीराव यांचे कारला डाव्या साईडने धडक दिली. या अपघातात बाजीराव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. तर शाहेद पठाण हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील- नारायाण नरहरी देशमुख यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184, 134 अ ब  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

धाराशिव  : गुळवे वस्ती, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- बालाजी रामचंद्श्र पवार हे दि.26.05.2023 रोजी 21.45  वा. सु. आपल्या ताब्यातील  मोटरसायकल  क्रं एमएच 12 बीसी 2559 ही एनएच 52  हायवे ढोकी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web