धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, तीन जखमी 

 
crime

धाराशिव  : तीर्थ ता. तुळजापुर येथील- शुभम धनराज काळे, वय 24 वर्षे, रा. तिर्थ ता. तुळजापुर हे दि.10.06.2023 रोजी 17.00 वा. सु. ते 17.15 वा चे सुमारास प्रतिक बिअर शॉपीच्या पुढे सांजा चौक उड्डाण पुलाचे सर्व्हिस रोड वरती छोटा हत्ती क्र एम एच 25 एजे 2114 च्या चालकांने त्यांचे ताब्यातील छोटा हत्ती ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने  चुकीच्या दिशेने चालवून शुभम यांचे मोटार सायकल ला समोरुन धडक दिली.  या आपघातात शुभम हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.अशा मजकुराच्या समाधान विलास पौळ यांनी दि.22.06.2023 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : खानापुर शिवारात धोंडीबा जोकार यांचे शेताजवळ येथील- अथर्व लक्ष्मण लुगडे वय 14 वर्षे रा. खानापुर हे दि.07.06.2023 रोजी 22.00 वा. सु मौजे खानापुर ता.तुळजापुर शिवारात धोंडीबा जोकार यांचे शेताजवळ मोटार सायकल क्रमांक एम एच 25 एवाय 6203 च्या चालकांने त्यांचे ताब्यातील मोटार सायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून पाठीमागे बसलेला अथर्व यास खाली पाडुन गंभीर जखमी केले आहे या आपघातात अर्थव हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.अशा मजकुराच्या मुक्ताबाई ज्ञानेश्वर धुते यांनी दि.22.06.2023 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ)  सह मो.वा.का. 134 अ,ब, 184 कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : बिरुदेव मंदिर समोरील रोडवर एम आय डी सी चौरस्ता ता. उमरगा येथील- कांताबाई बब्रुवान दुधभाते वय 55 वर्षे रा. नांगरवाडी ता. उमरगा हे दि.29.05.2023 रोजी 18.30 वा. सु मौजे दाबका येथे जावुन चौरस्ता ते लातुर असे ॲपे क्रमांक एम एच 25 एम 1425 याने येत असताना बिरुदेव मंदिर समोरील एम आय डी सी समोर रोडवर ट्रक्टर क्र एम एच 25 जी 3007 ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून ॲपे रिक्षास जोराची धडक देवुन कांताबाई दुधभाते यास खाली पाडुन गंभीर जखमी केले आहे या आपघातात कांताबाई हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.अशा मजकुराच्या गोविंद बब्रुवान दुधभाते यांनी दि.22.06.2023 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ)  सह मो.वा.का. 134 अ,ब, 184 कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web