धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात तीन ठार 

बेटजवळगा आणि कसबे तडवळे येथे अपघात 
 
crime

उमरगा  : बेटजवळगा, ता. उमरगा येथील- रणधीर माधव शिंदे, वय 47 वर्षे, सोबत गोपाळ माधव शिंदे हे दोघे दि.27.06.2023 रोजी 21.00 वा. सु. लातुर ते उमरगा जाणारे रोडवर कवठा पाटीजवळ मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 1197 वरुन जात होते. दरम्यान गोपाळ यांनी मोटरसायकल ही  हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मोटरसायकल स्लीप होवून रणधीर हे खाली पडून गंभीर जखमी होउन उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या प्रशांत हरिदास शिंदे यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : कसबे तडवळे, ता. उस्मानाबाद येथील- सोमा अर्जुन काळे सोबत त्यांचा मुलगा नारायण सोमा काळे हे दोघे दि.06.07.2023 रोजी 18.30 वा. सु. येडशी ते लातूर रोडवर सस्ते यांचे शाळेजवळ येडशी शिवार येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 5828 वरुन जात होते. दरम्यान आयशर टेम्पो क्श्र एमएच 20 जीसी 1611 च्या चालकाने आयशार टेम्पो हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून सोमा यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात सोमा व नारायण हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या रामा अर्जुन काळे यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 धाराशिव  : तुगाव, ता. उस्मानाबाद येथील- अमित सतिश मस्के यांनी दि.08.07.2023 रोजी 19.00 वा.सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र.एम.एच.13 सीएल 4239 ही येडशी ते लातुर बार्शी जाणारे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 कळंब : बोरवंटी, ता. उस्मानाबाद येथील-युवराज जरंगे हे दि. 08.07.2023 रोजी 11.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा एस  क्र. एम.एच. 04 एफ्यु 2634 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web