धाराशिवमध्ये चोरीच्या तीन घटना 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- शिवाजी विश्वनाथ जानराव, वय 72 वर्षे, रा. वडगाव सि, ता. जि. उस्मानाबाद यांचे  वडगाव सु शिवारातील शेत गट नं. 394 मधील विहीरीवरील अन्सान पंपनीची 3 एचपी चा विद्युत पंप अंदाजे 5,000 ₹ किंमतीचा हा दि. 23.07.2023 रोजी 18.00 ते दि.24.07.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवाजी जानराव यांनी दि.24.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : फिर्यादी नामे- तुळशीराम लिंबा जाधव, वय 50 वर्षे, रा. आंबी, ता. भुम जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 11 एआर 5622 ही दि.20.07.2023 रोजी 21.00 ते दि 21.07.2023 रोजी 05.00 वा. सु. तुळशीराम जाधव यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तुळशीराम जाधव यांनी दि.24.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- प्रभाकर भागवत शेटे, वय 63 वर्षे, रा. उपळा मा, ता. उस्मानाबाद यांचे उपळा शिवारातील शेत गट नं.121, 181,259 मधील एकुण 4 ईलेक्ट्रीक पानबुडी मोटर व केबल असा एकुण 50,000 ₹ किंमतीचा माल दि. 20.07.2023 रोजी 18.30 ते दि.21.07.2023 रोजी 11.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रभाकर शेटे यांनी दि.24.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम-379 ,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web