धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
तुळजापूर : बोरी, ता. तुळजापूर येथील- राहुल भिमा कांबळे, वय 27 वर्षे यांचे अज्ञात व्यक्तीने आठ व्यक्तींने दि. 18.06.2023 रोजी 00.30 ते 01.15 वा. सुमारास बोरी शिवारातील शेतातील वस्तीवर लक्ष्मीनगर येथे राहुल त्यांची पत्नी, बहिण, शेजारी राहणारे शिवा गायकवाड व त्यंची पत्नी यांना तलवारीचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन सोन्या, चांदीचे दागिणे, रोख रक्कम 40,000 ₹ असा एकुण 69,500 ₹ किंमतीचा माल जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या राहुल कांबळे यांनी दि.19.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : ढगेपिंप्रि, ता. परंडा येथील- धिरज विश्वनाथ हिवरे, वय 28 वर्षे यांचा अंदाजे 12,000₹ किंमतीचा मोबाईल फोन हा दि. 19.06.2023 रोजी 02.30 ते 03.00 वा. सुमारास हॉटेल राधीका गार्डन ढगेपिंप्रि फाटा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या धिरज विश्वनाथ हिवरे यांनी दि.19.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- लक्ष्मी महावीर ढोकर, वय 39 वर्षे यांचे दि. 19.06.2023 रोजी 16.30 वा. सुमारास नवीन बसस्टॅड तुळजापूर येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने लक्ष्मी यांचे पर्समधील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे एकुण 1,00,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या लक्ष्मी ढोकर यांनी दि.19.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.