धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : चांभारगल्ली, तुळजापूर येथील- भोलेनाथ गायकवाड, नागेश गायकवाड, वर्षा गायकवाड, वंदना गायकवाड, द्वारकाबाई गायकवाड या सर्वांनी दि.27.06.2023 रोजी 09.00 वा.सु. तुळजापूर येथे गावकरी- प्रयागाबाई श्स्त्रुघ्‌न राउत यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण  करुन जखमी केले. तसेच प्रयागाबाई यांचे बचावास त्यांची मुले ऋषीकेश व शुभम हे आले असता त्यासही शिवीगाळ करुनदगडाने मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रयागाबाई राउत यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : कौडगाव, ता. परंडा येथील- अंकुश कारंडे, काका ठवरे, नाना ठवरे,लक्ष्मण कारंडे, राजेश कारंडे, विजय कारंडे अन्य 4 या सर्वांनी शेतातील पोलवर वायर टाकण्याचे कारणावरुन दि.01.07.2023 रोजी 17.30 वा.सु. डोंजा शिवारात कांबळे वस्ती येथे कांबळे वस्ती, डोंजा येथील-रामचंद्र श्रावण कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच रामचंद्र यांचे बचावास आई गंगुबाई पत्नी चंद्रकला मुलगा संस्कार हे आले असता त्यासही शिवीगाळ करुन दगडाने मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामचंद्र कांबळे यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1)(आर)(एस),3(2) (व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : बावी, ता.  वाशी येथील- ज्ञानेश्वर शिंदे, भिमा शिंदे, राहुल काळे, परमेश्वर काळे, आप्पा काळे, या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 01.07.2023 रोजी 16.30 वा.सु. दरम्यान गोजवाडा शिवारातील पांगरकर यांचे कोठ्याजवळ शेतात गोजवाडा, ता. वाशी येथील- परमेश्वर भिमा शिंदे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, मोसाचे क्लच वायर, गॅसचा पाईप, दावे, चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर शिंदे यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web