बस, टेम्पो आदी वाहनातील डिझेल चोरणाऱ्या चोरट्यास अटक 

 
s

धाराशिव -  भोसले हायस्कुल, धाराशिव येथील- बसचालक-धनंजय कुंडलिक बिटे हे दि. 21.03.2023 रोजी 11.00 ते दि.22.03.2023 रोजी 05.30 वा पुर्वी तेर बसस्थानक येथे बस उभी केली असता बसमधील अंदाजे 13020 ₹ किंमतीचे डिझेल 140 लि. तसेच तेर येथील -विकास रामकृष्ण भोरे यांच्याही टेम्पो मधील  अंदाजे 4,650 ₹ किंमतीचे डिझेल 50 लि.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या धनंजय बिटे यांनी दि. 22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत ढोकी पो.ठा. गुरनं  115/2023 गुन्हा नोंदवला आहे. 

सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ईसम नामे विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब हा मस्सा येथे उभा आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी आलो असता तेथे एक इसम चारचाकी गाडी जवळ दिसला त्यास त्याचे नाव गाव व त्याचे ताब्यातील गाडी बाबत विचारले असता सदरची गाडी ही माझ्या मालकीची आहे असे सांगुन  त्याने त्याचे नाव- विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब असे सागिंतले.

त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याने सागिंतले की, मी व माझे साथीदार श्याम ऊर्फ आप्पा अजिनाथ शिंदे, रा. मांडवा, ता. कळंब, रामा शंकर काळे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांनी मिळून तेर येथील बसस्थानक मध्ये उभी असलेल्या बस मधील व तेरचे रस्त्यावरील टेम्पो मधील डिझेल चोरी केलेले आहे अशी कबुली दिली. यावरुन  ढोकी पो.ठा. गुरनं  115/2023  भा. द. सं. कलम  379  मुद्देमाल  70 लि. डिझेल दोन कॅन्ड सह आनंदनगर पो.ठा. येथील गु.रं.नं 93/2022 कलम  379 मधील डिझेल विकून मिळालेले  रोख रक्कम 5,200 ₹ व  गुन्ह्यात वापरलेली ईडीको गाडी सह असा एकुण 1,61,500 ₹ किंमतीच्या मालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव पोलीस ठाणे ढोकी, आनंदनगर व उमरगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- . यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- मनोज निलंगेकर, सफौ-काझी, पोलीस हावलदार- सय्यद, औताडे, काझी, पठाण, पोलीस अंमलदार- रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अंमलदार- राठोड, चव्हाण  यांच्या पथकाने केली आहे. 

From around the web