वाशीत दोन ठिकाणी तर भूम मध्ये एका ठिकाणी चोरी 

 
crime

वाशी  :पारगाव, ता. वाशी येथील- महादेव राजाराम मोटे, वय 48 वर्ष, यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.28.06.2023 रोजी 12.00 ते 15.30 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील  118 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 2,11,000 ₹ असा एकुण 4,47,000 ₹ किंमतीचा माल  चोरुन नेला. अशा मजकुराच्या महादेव मोटे यांनी दि.29.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : रामकुंड, ता. वाशी येथील- अंगद अंकुश हाके, वय 50 वर्ष, यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.28.06.2023 रोजी 11.00 ते 13.30 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील  29 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 35,000 ₹ असा एकुण 94,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अंगद हाके यांनी दि.29.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : वारेवडगाव, ता. भुम येथील- विजय मारुती फोके, वय 30 वर्ष, यांचे सह्याद्री ॲग्रो कृषी सेवा केद्रांचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.25.06.2023 रोजी 20.00 ते दि.26.06.2023 रोजी 08.00 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन दुकानातील  50 बॅग सोयाबीन, तननाशकचे 5 बॉक्स, राउंडअप तननाशक 2 बॉक्स,रिमुव्हर कंपनीचे तननाशक 6 बाटल्या असा एकुण 2,16,410 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजय फोके यांनी दि.29.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

कोंबड्याच्या खुरावड्याला आग लावून नुकसान

लोहारा  : जेवळी तांडा पुर्व, ता. लोहारा येथील- बाबु ठाकरु जाधव, वय 60 वर्षे, यांचे दि.27.06.2023 रोजी 22.30 वा. सु. जेवळी तांडा पुर्व शिवारातील गावकरी- पृथ्वीराज कारभारी, योगीराज कारभारी, रवी कारभारी अन्य 1 यांनी बाबु शिवीगाळ करुन जिवे ठार माण्याची धमकी देवून  कडब्याच्या पेंड्या, जैन कंपनीचे 44 स्पिंक्लर पाईप व कोंबड्याच्या खुरावड्याला आग लावून दिली. तसेच बुलेट मोटरसायकलला दगडाने मारून नुकसान केले. या मध्ये बाबु यांचे 94,500 ₹ चे नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या बाबु जाधव यांनी दि. 29.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web