तामलवाडी : सोने उजळुन देतो म्हणून महिलेची फसवणूक
May 13, 2023, 19:27 IST

तामलवाडी : मसला खुर्द, ता. तुळजापुर येथील- विठाबाई पांडुरंग नरवडे यांनी दोन अज्ञात इसम हे विठाबाई नरवडे यांचे घरी जावुन सोन उजळुन घ्या असे म्हणुन त्यांना दि. 12.05.2023 रोजी 12.00 वा. फसवणूक केली. अशा मजकुराच्या विठाबाई नरवडे यांनी दि.12.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420,406,34 कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव बसस्थानकात महिलेची पर्स चोरीस
धाराशिव : बसस्थानक , धाराशिव येथे राधा संजय गवळी यांची पर्स ज्यात अंदाजे 44,000 ₹ किंमतीची सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा दि.09.05.2023 रोजी 16.45 वा. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या राधा गवळी यांनी दि. 12.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.