तामलवाडी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैगिंक अत्याचार 

 
crime

तामलवाडी : आरोपी नामे- रमेश तुकाराम यमगर रा.यमगरवाडी ता.तुळजापुर जि. उस्मानाबाद,   यांनी गावातील एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून दि.09.08.2023 रोजी 09.30 वा. सु. वसंतराव गोपीनाथ पाटील शाळा नांदुरी ते सोलापुर येथील लॉजवर नेहुन जबरदस्तीने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच अशा मजकुराच्या पिडीतीने दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-376, भादविसह 4 बा.लैं.अ.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मागील भांडणाची कुरापत काढुन मारहाण 

धाराशिव  : आरोपी नामे-1)शहाजी वसंत सिरसट, 2) प्रदिप दगडु दंडनायक 3) प्रतिक फुलचंद सिरसट, 4) शिवम सतीश सिरसट, 5) अनिल वसंत सिरसट, 6) फुलचंद वसंत सिरसट  7) सतीश वसंत सिरसट 8) सरोजीनी फुलचंद सिरसट 9) अर्चना अनिल सिरसट 10) रंजना शहाजी सिरसट 11) सुषमा सतिश सिरसट सर्व रा.पळसवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी  दि.10.08.2023 रोजी 18.00 ते 18.15 वा. सु. पळसवाडी येथील फुलचंद सिरसट यांचे शेताजवळ फिर्यादी नामे- नानासाहेब सुरेश कोळगे, वय 30 वर्षे, रा. पळसवाडी, ता. जि. उस्मानाबाद यांना मागील भांडणाची कुरापत काढुन तसेच संगणमत करुन शिवीगाळ करुन फिर्यादीस व फिर्यादीच्या भावाचा मुलगा रोहीत व वहिनी सुनिता यांना रॉडने, तलवारीने हाताने व लाथबुक्याने मारुन जिवे मारण्याच्या उदेशाने तलवारीने डोक्यात मारत असताना वार चुकविल्याने उजव्या पायावर मार लागल्याने फिर्यादी जखमी केले.अशा मजकुराच्या नानासाहेब कोळगे यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-307,143,147,148,149,323,504,506 भादविसह 4/25 भारतिय शस्त्र अधि अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                

From around the web