अणदूरच्या हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थागुशा पोलिसांची छापेमारी 

नळदुर्ग पोलीस मात्र थंड  :  गोरे आल्यापासून काळे धंदे जोरात
 
s

अणदूर - नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादामुळे अणदूर मध्ये गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणत विक्री केली जात आहे, गावात किमान 16 ते 17 जण अवैध दारू विकत असताना नळदुर्ग पोलीस हप्ता घेऊन डोळ्यांवर काळी पट्टी बांधून गप्प होते. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास अणदूरच्या दारू अड्ड्याची   माहिती मिळताच, वडरगल्ली येथील पुष्पा फुलचंद बंदपट्टे या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापा मारून  ५० ते ६० लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. या महिलेवर अनेकवेळा छापेमारी  करूनही पुन्हा पुन्हा दारू विकत असल्याने या महिलेवर एमपीडीची कारवाई करण्याची  मागणी होत आहे. 

d

अणदूरमध्ये भल्या पहाटे आणि रात्रीच्यावेळी नळदुर्गच्या पाटील तांडा आणि मुळेगाव तांडा ( सोलापूर ) येथून हातभट्टी ( गावठी ) दारूचा पुरवठा होतो. दारू विकणाऱ्याकडून दरमहा दहा हजार आणि पुरवठा करणाऱ्याकडून दरमहा २५ हजार हप्ता घेऊन नळदुर्ग पोलीस मूग गिळून गप्प आहेत. 

एकीकडे गावठी हातभट्टीची दारू पिऊन गोरगरिंबांचे संसार उध्वस्त होत असताना , नळदुर्ग पोलिसांचे संसार मात्र फुलत आहेत. नळदुर्ग पोलीस स्टेशनला गोरे आल्यापासून काळे धंदे जोरात सुरु आहेत. 

From around the web