तेर येथे अवैधरित्या मद्याची साठवणूक करुन विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

पाच लाख 42 हजार 950 रुपयांचा मद्यसाठा जप्त
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राजकुमार अनिल लोमटे यांच्या राहत्या घरी गोव्यात निर्मित आणि गोव्यातच विक्रीसाठी असलेली 5 लाख 42 हजार 950 रुपये किंमतीचा अवैध मद्य साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे. उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी ही संयुक्त कार्यवाही केली आहे. 

महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलालजी उमाप यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य मुंबईच्या संचालिका श्रीमती उषा, औरंगाबाद विभागाचे विभागीय उपआयुक्त पी.एच.पवार आणि उस्मानाबादचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात परराज्यातून येणारे मद्य, कर चुकविलेले मद्य इत्यादी प्रकारच्या अवैध मद्य विक्रीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कार्यवाही करुन गुन्हे नोंदविण्याची मोहिम चालू आहे. गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक धाड सत्र आयोजित करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावर कार्यवाही करण्यात येत आहे. 

दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उस्मानाबाद तालुक्यातील मौजे तेर येथील राजकुमार अनिल लोमटे त्याच्या घरी अवैधरित्या गोवा राज्य निर्मीत आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा साठा केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार उस्मानाबादचे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर.एस.कोतवाल, प्रभारी भरारी पथक निरीक्षक पी.जी.कदम, दुय्यम निरीक्षक एस.के.शेटे, भूमचे दुय्यम निरीक्षक बी.एल.ओहोळ, एस.पी.काळे, डि.व्ही.भराट, ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक गाडे, डोंबाळे एल.ए., जवान आर.आर.गिरी, एम.पी.कंकाळ, व्ही.आय.चव्हाण, पोलिस नाईक तरटे, जिनेवाड, गुंड आणि महिला पोलिस श्रीमती स्वामी यांच्यासह गुप्त माहिती मिळालेल्या तेर येथील राजकुमार अनिल लोमटे यांच्या ताब्यातून 5 लाख 42 हजार 950 रूपये किंमतीचा गोवा राज्य निर्मीत आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त मुद्देमालात गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य मॅकडॉल नं.1 व्हिस्कीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या एक हजार 392 बाटल्या, इंम्पेरिअल ब्ल्यु व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 912 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 864 बाटल्या, मॅकडॉल रमच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 192 बाटल्या, मॅकडॉल रम, रॉयल स्टॅग व्हिस्की, इम्पेरिअल ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल नं.1 व्हिस्की इत्यादी ब्रॅन्डचे एकूण 967 बनावट लेबल असलेले गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा एकूण 70 बॉक्स (3360 बॉटल) मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी आणि इतर दोन फरार आरोपी यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(ए)(ई)(एफ), 81,83,90 आणि 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षकत एस.के. शेटे हे करीत आहेत. 

From around the web