शिराढोण : १५ गुन्ह्यांत पाहिजे असलेला एक आरोपी अटकेत

 
Osmanabad police

शिराढोण   : घरफोडी करुन सोयादाने चोरी केल्या संदर्भात शिराढोन पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 461, 380 नुसार दाखल असलेल्या गुन्हा नोंद क्र. 241 / 2021 मधील आरोपी- रमेश उध्दव चव्हाण, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद याचा शिराढोन पोलीस शोध घेत होते. रमेश हा एकुण 15 गुन्ह्यांमध्ये पोलीसांना तपासकामी हवा असल्याने पथक त्याच्या मागावर होते. अटक टाळण्यासाठी तो पोलीसांना गुंगारा देण्यासाठी मुक्कामाची स्थळे बदलत होता. यातूनच पथकास माहिती मिळाली की, रमेश हा पारधी पिढी, पळसप येथील आपल्या सासुरवाडीत आला आहे. यावर पोलीसांनी आज दि. 15.12.2021 रोजी त्यास अटक केले आहे.


अपहरण 

उस्मानाबाद  : वरुडा, ता. उस्मानाबाद येथील प्रकाश अगतराव गंगावणे, वय 41 वर्षे हे दि. 13.12.2021 रोजी 10.00 वा. आपल्या घरात असतांना कार क्र. एम.एच. 46 एयु 5228 मधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी प्रकाश यांना आठ लाख रक्कमेची मागणी करुन रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रकाश यांनाबळजबरीने आपल्या कारमध्ये बसवून नेउन खोपोली जवळील नांदोडे गावातील सुर्वे नावाच्या एका व्यक्तीच्या शेतात ठेवले आहे. अशा मजकुराच्या पिता- अगतराव फकीरा गंगावणे यांनी दि. 14 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 364, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

परंडा : भिमनगर, परंडा येथील सचिन चौतमल यांस दि. 12.12.2021 रोजी 22.30 वा. सु. गल्लीतील अजय व बुध्दम बनसोडे या दोघा भावांसह कुनाल शिंदे यांनी जुन्या वादातून शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन खाली पाडले आणि काठीने सचिन यांच्या नडगीवर मारहान केली. यात बचावादरम्यान सचिन यांच्या हाताच्या अंगठ्यास काठीचा फटका लागून तो मोडला. अशा मजकुराच्या सचिन चौतमल यांनी दि. 14 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325,  504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web