नळदुर्गमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार

 
crime

नळदुर्ग  : एका गावातील एक 22 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) सन 2021 ते दि. 09.06.2023 रोजी 06.00 वा. सु. नमुद महिला ही एकटी घरी असताना गावातील एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगीक अत्याचार केला.  तु कोणास काही  सांगितल तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि. 09.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 366,376 (2)(एन),506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    सामाईक बांधावर काटाडे टाकण्याचे कारणावरुन  मारहाण

उमरगा  : मुळज, ता. उमरगा येथील- लक्ष्मण दुधभाते, अरुण दुधभाते, किरण दुधभाते, शंकर दुधभाते या सर्वांनी सामाईक बांधावर काटाडे टाकण्याचे कारणावरुन दि.027.06.2023 रोजी 17.00 वा.सु. मुळज शिवारात गावकरी- किसन पांडुर्रग वडदरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने, हातावर मारुन हात मोडून त्यांचे मुलाचे डोळ्या मिरची पुड टाकली. तसेच किसन यांचे बचावास आलेले रामेश्वर हत्तरगे यांना कुह्राडीने मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चंद्रोदन माळी यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web