ढोकीजवळ वाटमारीच्या तयारीत असताना दरोडेखोर जेरबंद 

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे अन्य तीन गुन्हे दाखल 
 
crime

ढोकी : कोंड, ता. उस्मानाबाद येथील- किरण शकंर परदेशी, तानाजी विजय जाधव, अक्षय बाळू शिंदे, सचिन सतिश जाधव, बालाजी छत्रू जाधव, मोतीशवर बन्सी जाधव, अमर अनंत जाधव,तर पळसप येथील -सुनिल श्रीपती काळे अन्य 2 हे सर्वंजन  दि.09.06.2023 रोजी 22.10 वा. सु. पळसप पाटी ते जागजी रोडवर रेल्वे पुलाजवळ अंधारामध्ये कच्चा रस्ता येथे वाटमारी road robbery दरोडा टाकण्याचे तयारीत असताना दरोड्याचे साहित्यासह  ढोकी पो. ठा चे पथकास आढळले. अशा मजकुराच्या ढोकी पो. ठा. चे पोलीस अंमलदार-लक्ष्मण वामन शिंदे यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 399,402 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : खामकरवाडी, ता. वाशी येथील- अनुराधा औदुंबर होळे यांचे घराचे दरवाजा दि.09.06.2023 रोजी 21.00 ते दि. 10.06.2023 रोजी 06.00 वा. सु. अर्धवट उघडून आत प्रवेश करुन कापाटातील 40 ग्रॅम वजणाचे सुवर्ण दागिणे, चांदीचे दागिणे व रोख रक्कम 10,000 ₹ असा एकुण 55,000 ₹ किंमतचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अनुराधा होळे यांनी दि.10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : हागलुर, ता. तुळजापूर येथील- सिंधु कोंडीबा घुगे, वय 36 वर्षे, यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची फॅशन प्रो मोटरसायकल क्र एम एच 25 एएन 5328 ही दि. 05.06.2023 रोजी 20.30 वा. सु. ऑफीसचे समोरील रोडवर नळदुर्ग येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सिंधु घुगे यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :खरोसा, ता. औसा येथील- श्रीकांत शिवाजी भातमोडे हे दि.09.06.2023 रोंजी 15.00 वा. सु उमरगा बसस्थानक येथे उमरगा ते लातुर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन श्रीकांत याचे इजारीच्या खिशातील अंदाजे 37,000₹ रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या श्रीकांत भातमोडे यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web