कोरोना काळात जमा झालेल्या  दंडात्मक कारवाईच्या रक्कमेचा पोलिसांकडून अपहार 

आनंदनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदाराविरुद्ध केला ६ लाख ७८ हजाराचा अपहार 
 
crime


 धाराशिव  : कोरोना काळातील केलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये आकारलेल्या दंडनीय शुल्काची नोंद शासकीय किर्दवर कुठेही न करता व शासन खाती चलनाव्दारे बॅकेत भरता  न करता एकुण सहा लाख ७८ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या आनंदनगर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस हवालदाराविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी नामे- प्रविण गणपतराव तावशीकर  पोलीस हवालदार /632 पोलीस ठाणे आनंदनगर यांनी  दि.13.11.2020 ते दि.27.01.2023 या कालावधीत पोलीस ठाणे आंनदनगर येथे कॅश मोहरर या पदाचा गैरवापर करुन पोलीस ठाणे आनंदनगर येथील पोलीस संरक्षण तसेच कोरोना काळातील केलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये आकारलेल्या दंडनीय शुल्काची नोंद शासकीय किर्द वर कुठेही न करता व शासन खाती चलनाव्दारे बॅकेत भरता  न करता एकुण 06,78,364 ₹ स्वताच्या फायद्यासाठी वापर करुन नमुद रक्कमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोरक्षनाथ रोहीदास खरड, सहा. पोलीस  निरीक्षक, पोलीस ठाणे, आनंदनगर यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सरकारी नौकरास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

धाराशिव : आरोपी नामे-1)सुरेश काशीनाथ राठोड, 2)आकाश सुरेश राठोड, 3) राम सुरेश राठोड, 4) जणाबाई सुरेश राठोड,5) जयश्री सुरेश राठोड, सर्व रा. भातंब्रा तांडा, ता. बार्शी जि. सोलापूर ह.मु. अंबेजवळगे शिवार ता.जि. उस्मानाबाद  यांनी दि. 28.07.2023 रोजी 21.30 वा. सु घाटांग्री सबस्टेशन जवळ अंबेजवळगे शिवारात रोडवर कार उभी करुन का थांबले तुम्हाला काय आडचण आहे का असे विचारण्याचे कारणावरुन फियादी नामे भिमराव धोंडीबा ढगे, वय 53 वर्षे, पोलीस हावलदार 303 ने. पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण यांना सुरेश राठोड यांनी शिवीगाळ करुन हाता चापटाने मारहान केली. तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या भिमराव ढगे पोलीस हावलदार 303 ने पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 323, 504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

 

 

From around the web