दोन जुगाऱ्यांना आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

भूम  : भुम पोलीस ठाणे हद्दीत जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन करणाऱ्या मंगेश रघुनाथ गवळी व औदुंबर वसंत सावंत यांस प्रत्येकी 300 ₹ आर्थिक दंडाची शिक्षा आज दि. 22.1.2021 रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी सुनावली आहे.


जुगार प्रतिबंधक कारवाई

उस्मानाबाद : जुगार प्रतिबंधक कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 21.12.2021 रोजी तीन ठिकाणी छापे मारले. यात 1) उस्मानाबाद येथील- श्रीनाथ माळी, जितेंद्र पवार, सुरज पवार, महेश कांबळे, सुखदेव कदम, जितेंद्र राझे यांसह सोलापूर येथील- सिध्दु स्वामी व धनराज गोरे हे सर्व येरमाळा येथील एका लॉजजवळ ऑनलाईन टायगर मटका जुगार साहित्यासह 8,010 ₹ रक्कम बाळगले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले. 2) भवानी चौक, उस्मानाबाद येथील रुपेश शेरखाने हे सांजा चौकात कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,020 ₹ रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 3) अमृतनगर, उस्मानाबाद येथील अजय खिलारे हे संभाजी चौक, उस्मानाबाद येथील एका गाळ्यात ऑनलाईन चक्री मटका जुगार साहित्यासह 16,150 ₹ रक्कम बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

  यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : बावी, ता. भुम येथील ओंकार कांबळे हे दि. 21.12.2021 रोजी गाव शिवारात एका पिशवीत 180 मि.ली. क्षमतेच्या 16 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले. तर इंदिरानगर, कळंब येथील लहु मोहिते हे राहत्या परिसरात एका कॅनमध्ये 5 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.  यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web