धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

तुळजापूर : मयत नामे- शहाजी गोरोबा दांगट, वय 37 वर्षे, रा.रायखेल, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.24.08.2023 रोजी 19.00 वा. सु. हंगरगा येथील बायपास रोडवरील ब्रीजवर येथुन मोटरसायकल क्र एमएच 13 एपी 5170 समोरुन जात होते. दरम्यान ट्रक क्र जीजे 12 बीटी 8940  च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून शाहाजी दांगट यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात  शहाजी दांगट हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रक चालक हा आपघात स्थळावरुन ट्रकसह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नागनाथ वसंत वारुळे, वय 42 वर्षे, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) मो.वा. का. कलम  (अ), 134 (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  :फिर्यादी नामे- केशव गंगाराम करपे, वय 42  सोबत  पत्नी नामे- छाया केशव करपे, वय 40 वर्षे, रा. जवळबन ता. केज जि. बीड हे दोघे  मोटरसायकल क्र एमएच 44 एल 2275 वरुन पिंपळगाव ते तांदुळजामार्गे थोड्या अंतरावर समोरुन येणारी मोटरसायकल क्र एमएच 25 एफडब्ल्यु 9556 चा चालक नामे अच्युत रानबा कुंभकर्ण रा. घारगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून केशव करपे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात  केशव करपे यांची पत्नी छाया करपे या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या केशव करपे यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 मो.वा. का. कलम  184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : आरोपी नामे-1) राम विश्वनाथ मुंगळे, वय 32 वर्षे, रा. माळगीवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद 2) सुरेश विलास लोंढे, वय 40 वर्षे, रा. आष्टा (ज) ता. उमरगा जि. उस्मानाबाद या दोघांनी दि. 25.08.2023 रोजी 20.15 ते 20.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील मोटरसायकल हे तुरोरी ते दगड धानोरा रोडवर तपसाले हॉटेल समोरुन तर आरोपी नामे- कणील शरणाप्पा किंटेकर, वय 43 वर्षे, रा. हल्लीखेड ता. हुमनाबाद जि. बिदर हे आपआपल्या ताब्यातील लिलॅन्ड कंटेनर क्र टीएस 15 युई 6949 हा अत्तार पे पंप समोर एन एच 65 सोलापूर ते हैद्राबाद रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द उमरगा पो. ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web