नळदुर्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे लोहगावमध्ये खून 

 
crime

नळदुर्ग  : लोहगाव, ता. तुळजापूर येथे काटकर परिवारात शेतीचा वाद होता, त्याच्या तक्रारी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या.सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने एकाचा खून झाला आहे. 


अमोल शिवाजी काटकर ( वय 32 ) याचा शेतीच्या वादातून खून झाला असून, याप्रकरणी शंकर काटकर, नागनाथ काटकर, सचिन काटकर यांच्यावर  भा.दं.सं. कलम- 302, 34  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहगाव, ता. तुळजापूर येथील-शंकर काटकर, नागनाथ काटकर, सचिन काटकर, यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन दि.28.06.2023 रोजी 23.00 ते दि.29.06.2023 रोजी 07.00 वा. सु. लोहगाव शिवारातील शेतात गावकरी-अमोल शिवाजी काटकर, वय 32 वर्षे यांना मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ  संतोष शिवाजी काटकर यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.काटकर कुटुंबात शेतीचा वाद होता. त्याच्या तक्रारी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल असताना , पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही, त्यामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. 

लोहगाव खून प्रकरणी मेन आरोपी मोकाट 

लोहगावमध्ये  अमोल शिवाजी काटकर ( वय 32 ) याचा शेतीच्या वादातून खून झाला असून, याप्रकरणी शंकर काटकर, नागनाथ काटकर, सचिन काटकर यांच्यावर  भा.दं.सं. कलम- 302, 34  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु एका मुख्य आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही. हा आरोपी शिक्षक असल्याची चर्चा सुरु असून, याप्रकरणी मोठी तोडपाणी झाल्याचे समजते. हा खून २८ जून रोजी झाला होता आणि गुन्हा ३० जून रोजी दाखल करण्यात आला. याचा अर्थ पाणी कुठं तरी मुरत आहे, असा संशय येत आहे. 

From around the web