डिकसळमध्ये एलपीजी टाक्या , शेगड्या चोरणारे दोघे अटकेत 

 
s

कळंब  : डिकसळ, ता. कळंब येथील विकास सुनिल वाघमारे व उत्तरेश्वर अदमाने यांच्या शिराढोन रस्त्यालगतच्या दोन हातगाड्यांचे कुलूप दि. 07- 08.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 3 एलपीजी टाक्या व 2 शेगड्या चोरुन नेल्या होत्या. यावरुन विकास वाघमारे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा क्र. 424 / 2021 हा नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान कळंब पो.ठा. चे प्रभारी अधिकारी पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- सुनिल कोळेकर, गोविंद पतंगे, पोना- अजिज शेख, गणेश वाघमोडे, पोकॉ- शिवाजी राऊत, हनुमंत चव्हाण यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डिकसळ येथील 1)अनिल बाबुराव कांबळे 2)ज्ञानेश्वर दशरथ गायकवाड या दोघांना काल दि. 17 डिसेंबर रोजी अटक करुन गुन्ह्यातील नुमूद चोरीचा माल त्यांच्याकडून जप्त केला आहे. 


वाघोलीमध्ये चोरी 

उस्मानाबाद  : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील विशाल शिवाजी खडके यांच्या सांजा रोड, उस्मानाबाद येथील विश्व बॅटरी व हार्डवेअर दुकानाच्या शटर दि. 16- 17.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून आतील ॲमारॉन बॅटरी, 15 चष्मे व 460 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विशाल खडके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web