जास्त व्याजाचे अमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक 

बीडच्या मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी संचालकाविरुद्ध वाशीत गुन्हा दाखल 
 
crime

वाशी  : आरोपी नामे- 1) अनिता बबन शिंदे( चेअरमन/अध्यक्ष), 2) बबन विश्वनाथ शिंदे 3) मनिषा बबन शिंदे,4) योगेश कारंडे, 5) अश्विनी सुनिल वांढरे, सर्व रा. राजीव गांधी चौक, बीड 6)अशोक गोविंद लावंडे, मॅनेजर शाखा ईट, रा. महिंद्रावाडी ता. पाटोदा, 7) शिवराज शशिकांत बिरबले क्लर्क रा. भुम जि. उस्मानाबाद, 8) श्ंकर भास्कर हाडुळे- कॅशीयर रा. ईट ता. भुम जि. उस्मानाबाद 9) अमोल नामदेव पवार- क्लर्क रा. घाटनांदुर ता.भुम जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.07.2023 रोजी पासुन आज पावेतो फिर्यादी नामे- अनुराथ बापुराव महाकले, वय 65 वर्षे, लांजेश्वर ता.भुम जि. उस्मानाबाद यांची जास्त व्याजाचे अमिष दाखवून त्यांचे जिजाउ मॉ साहेब मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा ईट येथे मुदत ठेव व बचत ठेव स्वरुपात अस सर्व मिळून 3,72,01,494 ₹स्विकारुन त्यांचे खाजगी कामासाठी व फायद्यासाठी इतर ठिकाणी वापरुन पैशाचा अपहार करुन फसवणूक करुन विश्वासघात केला. अशा मजकुराच्या अनुरथ महाकले यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 409, 420, 120 (ब)  सह 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाने संरक्षण) अधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला असुन सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. शेजाळ हे करीत आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

धाराशिव  : फिर्यादी नामे- प्रशांत विश्वनाथ पडवळ, वय 37 वर्षे, रा. उपळा ता.जि. उस्मानाबाद यांचे दि.15.07.2023 रोजी 24.00 वा. सु. दि.16.07.2023 रोजी 06.00 वा. सु.  शेत गट नं 398 मधील पत्रयाचे शेडमध्ये करडी धान्याचे 4 कट्टे अंदाजे 10,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रशांत पडवळ यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : फिर्यादी नामे- तानाजी कल्याण पाटील, वय 40 वर्षे, रा. डोमगाव 1 ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे दि.16.07.2023 रोजी 24.00 वा. सु. दि.17.07.2023 रोजी 04.30 वा. सु. शेत गट नं 145 डोमगाव ते सोनारी रोडलगत  गोठ्यातील एक म्हैस व एक रेडकू अंदाजे 65,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या तानाजी पाटील यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web