धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
उमरगा : माकणे ता. उमरगा येथील- महादेव दत्तु माकणे, वय 32 वर्षे यांचे घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 22.06.2023 रोजी 00.01 ते 05.30 वा. सुमारास तोडून आत प्रवेश करुन सुवर्ण दागिणे व रोख रक्कम असा एकुण 1,65,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या महादेव माकणे यांनी दि.22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुर : पांचुदा तलाव ता.तुळजापुर येथील- नरेश दामोदर अमृतराव, वय 58 वर्षे, यांची 3 एचपी पाणबुडी मोटार अंदाजे 21,000 ₹ किंमतीची व टेक्स्मो कंपनीची साडे सात एच पी ची पाणबुडी मोटार अंदाजे 32,000 रु तसेच लाडा कंपनीची 5 एच पी पाणबुडी मोटार अंदाजे 17,000 रु असा एकुण 70,000 रु चा माल दि. 22.06.2023 रोजी 13.34 वा. सु. तुळजापुर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नरेश अमृतराव यांनी दि. 22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : भिमनगर वाशी येथील- चंदना प्रविण सुकाळे, वय 40 वर्षे, घराचा दरवाजा उघडा ठेवुन झोपली असता एक विवो कंपनीचा विवो वाय 15 निळया रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 5000 रु चा माल दि. 22.06.2023 रोजी 13.29 वा. सु. भिमनगर वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंदना प्रविण सुकाळे यांनी दि. 22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : उंबरे कोठा, उस्मानाबाद येथील- अमित सहदेव हाराळे सेबत दोन मित्र असे दि. 23.06.2023 रोजी 19.20 वा. सुमारास लेडीज क्लब उस्मानाबाद समोर मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 3626 वरील अज्ञात दोन व्यक्तीने मित्र रितेश यास मारहाण करुन त्यांचे 6 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे जबरीने चोरुन घेवून जाण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अमित हाराळे यांनी दि.23.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 393, 341, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.