उमरगा तालुक्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे-1) राजाभाउ श्रीमंत जाधव 2) संजय श्रीमंत जाधव, दोघे रा. व्हंताळ ता. उमरगा, जि. उस्मानाबाद यांनी तुझ्या मुलाने पोलीसात तक्रार का दिली या कारणावरुन दि.30.07.2023 रोजी 00.30 वा. सु. व्हंताळ येथे फिर्यादीच्या राहते घरी फिर्यादी नामे-वंदना राजभाउ जाधव, वय 45 वर्षे रा. व्ंताळ, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना घरात घुसून राजाभाउ जाधव यांनी शिवीगाळ करुन तुझ्या मुलाने आमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून बाटलीत पेट्रोल काढून वंदना यांचे अंगावर टाकले. तर संजय जाधव यांनी काडीने पेटवून देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या वंदना जाधव यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 452, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1) राजेंद्र जिवय जमादार, 2) विकास विजय जमादार,3) गणेश मनोहर जमादार, 4) मारुती किसन जमादार सर्व रा. मुळज ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि. 30.07.2023 रोजी 15.00 वा. सु. आरोग्य नगरी कॉर्नर उमरगा येथे फिर्यादी नामे- दिलीप हुसेन पवार वय 32 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने व वेळुचे काठीने दिलीप व त्यांचा पुतण्या आकाश राम पवार यांना मारहाण केली.  तसेच फियादीची पत्नी त्यांचे बचावास आले असता. त्यासही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिलीप पवार यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323,504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा : आरोपी नामे-1) शंकर सुधाकर सुर्यवंशी, 2) गणेश बब्रुवान पवार, रा. व्हंताळ, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी आर्थिक व्यवाहाराचे कारणावरुन दि. 29.07.2023 रोजी 08.30 वा. सु. एकुरगायेथील राम धनगर यांचे विटभट्टी जवळ फिर्यादी नामे- शिवाजी गिरीधर जाधव, वय 35 वर्षे, रा. व्हंताळ ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने करुन शिवाजी जाधव यांचे डाव्या पायाचे हाड मोडून जिवे ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी जाधव यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आरोपी नामे-1) सादिक नबी शेख, 2) बाशा गुलाब तुजावर,3) मौला गुलाब मुजावर, 4) हब्बीब मुजावर, 5) महंमद हुसेन अब्दुल मुजावर सर्व  रा. तुगाव, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी मोटरसायकलचा धक्का लागल्याचे कारणावरुन दि. 30.07.2023 रोजी 01.00 वा. सु. तुगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी नामे- अशोक उर्फ शडाक्षरी शंकर स्वाती, वय 47 वर्षे, रा. तुगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना व त्यांचा मुलास जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक स्वाती यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-143, 147, 149, 324, 323, 504, 506, सह अ.जा. ज. अ. प. का. कलम 3(2)( व्हि.ए.), 3(1) (आर) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web